रावेतमध्ये थेंब-थेंब पाण्यासाठी वणवण

रावेतमध्ये थेंब-थेंब पाण्यासाठी वणवण
Published on

रावेत, ता. ६ : रावेत परिसरात आणि प्रभाग क्रमांक १६ मध्ये सध्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. कमी दाबाने पाणी येत असल्यामुळे नागरिकांना दैनंदिन गरजा भागवणेही कठीण झाले आहे. महापालिकेकडे तक्रारी करूनही तोडगा निघत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. या बाबत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय अधिकारी प्रवीण धुमाळ यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.
रावेत उपसा केंद्रातून शहराला पाणीपुरवठा केला जातो. मात्र ‘दिव्याखाली अंधार’ या उक्तीप्रमाणे रावेतच्याच सोसायट्या आणि वस्त्या तहानल्या आहेत. बीआरटी रस्ता, रावेत गावठाण, शिंदे वस्ती आणि विकासनगर परिसरात पाणी सोडण्याच्या वेळा निश्चित नाहीत. पाणी आलेच, तर वेग कमी असतो. त्यामुळे टाक्या भरणे अशक्य होते. बादली भरण्यासाठी सरासरी दहा मिनिटे लागतात, अशी तक्रार नागरिकांनी केली आहे. दरम्यान, ‘‘या स्थितीचा फायदा खासगी टँकरचालक घेत आहेत. उन्हाळ्याची तीव्रता वाढत असतानाच पाण्याची ही कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे की काय,’’ अशी शंका आता रहिवासी उपस्थित करत आहेत.
‘‘प्रशासनाने पाणीपुरवठा सुरळीत केला नाही, तर आंदोलन करू’’ असा इशारा माजी नगरसेवक तुकाराम भोंडवे यांनी दिला आहे.

आमच्या सोसायटीत दोन-दोन दिवस पाणी येत नाही. आले तरी त्याचा दाब कमी असतो, की मोटार लावूनही उपयोग नसतो. आम्ही नियमित पाणीपट्टी भरतो, तरीही खर्च करून खासगी टँकर मागवावे लागत आहेत. महापालिकेने हा खेळ थांबवावा.
- सचिन काळभोर, रहिवासी, रावेत

सकाळी घाईच्या वेळी पाणी येते आणि काही वेळातच जाते. दाब नसल्यामुळे पाणी साठवता येत नाही. पिण्यासाठी पाणी विकतच घ्यावे लागते. प्रशासनाला आमचे हाल दिसत नाहीत, अशी अवस्था आहे.
- अर्चना सुराणा, रहिवासी, सेक्टर २९, रावेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com