दिव्यांग संस्थेला ई-बाईक भेट

दिव्यांग संस्थेला ई-बाईक भेट
Published on

रावेत, ता. २३ : डेटा ॲक्सल कंपनीकडून आपल्या सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) निधीतून रावेतमधील झुंज दिव्यांग संस्था, आश्रम प्रशिक्षण केंद्राला ई-बाईक भेट देण्यात आली.
या ई-बाईकचा उपयोग आश्रमातील दिव्यांग विद्यार्थी ऑनलाइन डिलिव्हरी सेवांसाठी करणार आहेत. शारीरिक मर्यादांवर मात करून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी हे एक मोठे साधन ठरणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ उत्पन्नाचे साधनच मिळणार नाही, तर त्यांच्या आत्मविश्वासातही मोठी वाढ होणार आहे.
या संपूर्ण उपक्रमासाठी डेटा ॲक्सल कंपनीचे शार्दुल जाधव, आतिश बुद्धे, स्वप्नील शेमडकर आणि सुरक्षित भालकेश्वरे यांचे मोलाचे योगदान लाभले. केंद्राचे संस्थापक अध्यक्ष राजू हिरवे आभार यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com