पवनेत विनाप्रक्रिया सांडपाणी सोडणे सुरूच

पवनेत विनाप्रक्रिया सांडपाणी सोडणे सुरूच
Published on

रावेत, ता.१६ : पवना नदी प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालला आहे. रावेत परिसरातील विविध नाल्यांद्वारे मैलायुक्त सांडपाणी कोणत्याही प्रक्रियेशिवाय थेट नदीपात्रात सोडणे सुरूच आहे. प्रशासनाचे याकडे होत असलेले अक्षम्य दुर्लक्ष स्थानिक नागरिकांच्या जीवावर उठले आहे. त्यामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
रावेत गावठाण, कातळे वस्ती आणि किवळे भागांतून वाहणाऱ्या मोठ्या नाल्यांचे पाणी थेट पवना नदीत जाऊन मिळते. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या भागात हे सांडपाणी मिसळत आहे, त्याच्या अगदी जवळच महापालिकेचे पाणी उपसा केंद्र आहे. येथूनच संपूर्ण शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांचे बंद पडलेले एसटीपी प्रकल्प आणि महापालिकेचे ढिसाळ नियोजन यामुळे नदीचे पात्र आता गटार बनू लागले आहे. पाण्याला येणारी दुर्गंधी आणि साचणारा फेसाळ तवंग यामुळे नदीकाठच्या नागरिकांचे जगणे असह्य झाले आहे.

आम्ही ज्या नदीचे पाणी पितो, त्याच नदीत शहरातली सगळी घाण प्रक्रिया न करता सोडली जात आहे. महापालिका आमच्या आरोग्याशी खेळत आहे. वारंवार तक्रारी करून आणि उपोषणे होऊनही अधिकारी ढिम्म आहेत. आम्हाला तातडीने स्वच्छ पाणी आणि नदी प्रदूषणमुक्त हवी आहे.
- अशोक भोंडवे, रहिवासी, रावेत

उन्हाळ्यामुळे आधीच पाण्याचा साठा कमी आहे. त्यात या सांडपाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला आहे. घराघरांमध्ये डेंगी आणि तापाचे रुग्ण आढळत आहेत. प्रशासनाने सांडपाणी नाल्यांवर प्रक्रिया केंद्र (एसटीपी) का उभारले नाही ?
- सुनीता काळभोर, स्थानिक रहिवासी, कातळे वस्ती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com