सोमाटण्यातील शाळेत
मतदार जनजागृती

सोमाटण्यातील शाळेत मतदार जनजागृती

Published on

शिरगाव, ता. ५ : मावळ तालुका तहसील कार्यालय महसूल विभाग यांच्यावतीने सोमाटणे येथील तुळजा भवानी विद्यालयात मतदार जनजागृती या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपक्रमाची सुरवात
प्रभातफेरी काढून करण्यात आली. यावेळी मुलांनी मतदार जनजागृती संबंधित पोस्टर तयार करून लोकांचे लक्ष आकर्षित केले. नवनवीन घोषणा तयार करून, मतदान करणे ही आपली जबाबदारी आहे आणि ती प्रत्येक मतदार नागरिकाने प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजे, असे यात लिहिले होते.
मतदार जागृती संबंधित चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आयोजित करून घराघरांमध्ये मतदान जागृती करण्यात आली. यावेळी तलाठी अभिषेक शेलार, सुबोध शिंदे, राजू आगळे, तुळजाभवानी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र गिरीगोसावी, सुरेश सुतार, कौमूद खुडे, सुरेश घारे, वैशाली केंगले आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com