शिरगावात श्रमदानामधून वनराई बंधाऱ्यांची उभारणी
शिरगाव, ता १९ : ‘गाव करी ते राव न करी’ याचा प्रत्यय नुकताच शिरगाव येथे आला. गाव एकत्र आले, तर काय शक्य नाही ? हे शिरगावकरांनी खरे करून दाखविले. गावाने एकत्र येऊन श्रमदानामधून वनराई बंधाऱ्यांची उभारणी केली. जलसंधारणाच्यादृष्टीने हे बंधारे महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.
पुणे जिल्हा परिषद व मावळ पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत बंधाऱ्यांची उभारणी करण्यात आली. या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ‘पाणी अडवा - पाणी जिरवा’ या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीत उतरवत गावातील ओढे व नाल्यांमध्ये वनराई बंधारे बांधण्यात आले. यामुळे पावसाचे पाणी साठवून ते जमिनीत मुरण्यास मदत होणार असून भूजलपातळी वाढीस मोठा हातभार लागणार आहे. जलचक्र पुन्हा सुस्थितीत येण्यास मदत होणार आहे. शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढून विहिरी व विंधन विहिरी यांना पाणी मिळणार आहे. या श्रमदानात आमदार प्रकाश देवळे माध्यमिक विद्यालय येथील विद्यार्थी व शिक्षकांनी सक्रिय सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कामात सहभागी होत सामाजिक जबाबदारी पार पाडली. शिक्षकांनी मार्गदर्शन करत पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सरपंच पल्लवी गोपाळे, उपसरपंच पूजा गोपाळे, ग्रामपंचायत सदस्य समीर अरगडे, स्वप्नील अरगडे, अक्षय गोपाळे, श्रीधर गोपाळे, वैशाली गोपाळे, ग्रामसेवक नामदेव चव्हाण, सोमनाथ गोपाळे, मुख्याध्यापक रमेश फरताडे, शिक्षक रामभाऊ घुगे, किरण धादवड, सुखदेव गोपाळे, संतोष मरगळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
प्रत्येक गावाने श्रमदान करून असे बंधारे बांधले, तर पर्यावरणाचा होणार ऱ्हास कमी होईल. शिवाय येणाऱ्या पिढ्यांना श्रमदानाने महत्त्व समजेल आणि गावात एकोपा निर्माण होईल. त्यामुळे या अभियानाची ग्रामीण भागांत प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.
- पल्लवी गोपाळे, सरपंच, शिरगाव ग्रामपंचायत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

