सजावट, पौराणिक देखावे, सांस्कृतिक कार्यक्रम
काळेवाडी, ता. ३१ : काळेवाडी, रहाटणी परिसरातील गणेश मंडळांनी यावर्षी सुंदर सजावटीसह विविध पौराणिक देखावे, विद्युत रोषणाई आणि साधेपणावर भर दिला आहे. पावसाच्या हजेरीमुळे काळेवाडी परिसरात अनेक मंडळांनी मोठे देखाव्यांसह इतर गोष्टींना फाटा देत जिवंत देखावे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन केले आहे.
सांस्कृतिक कार्यक्रम
काळेवाडी येथील आझाद मित्र मंडळ स्पोर्टस क्लबने आकर्षक सजावट करून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. मंडळाचे यंदाचे ३८ वे वर्ष असून काळुराम नढे हे अध्यक्ष आहेत.
मंदिरात प्रतिष्ठापना
काळेवाडी येथील अमरदीप मित्र मंडळाच्या गणेश मंदिरात ‘श्रीं’च्या आकर्षक मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. मंडळाचे यंदाचे ३९ वे वर्ष आहे. नागेश कदम हे मंडळाचे अध्यक्ष आहेत.
पौराणिक देखावा
पवना कला - क्रीडा सांस्कृतिक मित्र मंडळाचे यंदाचे ३६ वे वर्ष आहे. मंडळाने शारदा गजानन भव्य मूर्तीद्वारे पौराणिक, आध्यात्मिक देखावा सादर केला आहे. प्रशांत नढे हे मंडळाचे अध्यक्ष आहेत.
जंगले वाचविण्याचा संदेश
नढेनगर येथील जीवन चौकातील विनायक मित्र मंडळाने आपल्या देखाव्याच्या माध्यमातून पर्यावरण व जंगल वाचवण्यासाठी संदेश दिला आहे. मंडळाचे यंदाचे ४० वे वर्ष आहे. नीलेश भालेकर हे मंडळाचे अध्यक्ष आहेत.
सायबर गुन्ह्यांबाबत जागृती
जोतिबा कामगार कल्याण मित्र मंडळाने यावर्षी सायबर गुन्ह्यांवर आधारित ‘सायबर सुंदरी - फोन आला... फसवणूक झाली’ हा जिवंत देखावा सादर केला आहे. मंडळाचे यंदाचे ४१ वे वर्ष आहे. नितीन खेडकर हे अध्यक्ष आहेत.
प्रत्येक वर्षी मंडळाकडून विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपली जाते.
सुंदर गणेशमूर्ती स्थापना
काळेवाडी येथील रत्नदीप मित्र मंडळाचे यंदाचे १६ वे वर्ष आहे. मंडळाने यावर्षी सुंदर व आकर्षक गणेश मूर्ती स्थापन केली असून अंकुश चौबे हे अध्यक्ष आहेत.
साधेपणावर भर
काळेवाडी येथील श्रीकृष्ण मित्र मंडळाने साधेपणावर भर दिला आहे. मंडळ यंदा ४२ व्या वर्षात पदार्पण करत आहे. तुषार कोकणे हे मंडळाचे अध्यक्ष आहेत.
बालाजी मंदिर
पंचनाथ मित्र मंडळाने यावर्षी आकर्षक सजावट बालाजी मंदिर देखावा सादर केला आहे. मंडळाचे १८ वे वर्ष असून मंडळाने सामाजिक उपक्रमावर भर दिला आहे.
महिला अत्याचारांवर प्रकाश
रहाटणीमधील रामनगर येथील सेव्हन स्टार स्पोर्टस क्लब मित्र मंडळाने यावर्षी ‘शूर व्हा वीर व्हा, शिवरायांची तलवार व्हा.’ हा महिलांवरील अत्याचार प्रकाश टाकणारा जिवंत देखावा सादर केला आहे. राज तांबे हे मंडळाचे अध्यक्ष आहेत.
सुवर्ण मंदिर
रहाटणी गाव येथील शिवछत्रपती मित्र मंडळाने सुवर्ण मंदिराचा देखावा सादर केला आहे. मंडळाचे यंदाचे ३६ वे वर्ष आहे. मंडळाचे अध्यक्ष देविदास नखाते, तेजस संतोष नखाते, प्रशांत जगताप, चिराग भालेराव हे काम पाहतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.