घरगुती गॅस सिलिंडरचा व्यवसायासाठी वापर

घरगुती गॅस सिलिंडरचा व्यवसायासाठी वापर

Published on

काळेवाडी, ता. ८ : घरगुती वापरासाठी दिल्या जाणाऱ्या एलपीजी गॅस सिलिंडरचा वापर व्यावसायिक कारणांसाठी केला जात आहे. हॉटेल, ढाबे, केटरिंग सेवा, चहाच्या टपऱ्या तसेच लघुउद्योगांमध्ये घरगुती सिलिंडर वापरले जात आहेत. यामुळे सार्वजनिक सुरक्षिततेलाही धोका निर्माण होत आहे. काळेवाडी परिसरातील विजयनगर, बीआरटी रस्ता, काळेवाडी गावठाण, तापकीर चौक, तापकीर मळा, भारत माता चौक आणि व्यवसायाच्या ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत आहे.

शासनाच्या पेट्रोलियम व गॅस मंत्रालयाच्या निर्देशानुसार घरगुती वापरासाठी १४.५ किलो वजनाचे सिलिंडर व व्यावसायिक धारकांसाठी वापरण्यासाठी १९.५ किलो वजनाचे सिलिंडर पुरवठा व वापर करण्याचे आदेश आहेत. पुरवठा विभाग, अन्न व औषध प्रशासन विभाग आणि महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष दिसून येत आहे. काळेवाडी, रहाटणी तसेच इतर परिसरात घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर व्यवसायासाठी उघड्यावर ठेवत वापरले जात असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी उज्वला योजनेतून मिळणाऱ्या सिलिंडर ही वापर होत आहे.
काळेवाडी, रहाटणी तसेच शहरातील चौकाचौकात व मुख्य बाजारपेठेत व इतर परिसरात असणारे व्यावसायिक वडापाव, भेळपुरी, अंडाभुर्जी, हॉटेल व इतर व्यावसायिक व त्यातही परराज्यातील व्यावसायिक मोठ्या संख्येने घरगुती गॅस सिलिंडरचाच वापर करताना आढळून येत आहेत. घरगुती गॅसचा सहज मिळणारा पुरवठा व व्यावसायिक सिलिंडर व घरगुती गॅस सिलिंडरमधील किमतीतील तफावत यामुळे व्यावसायिक घरगुती गॅस सिलिंडरचा वापर करतात.
या व्यावसायिकांना हे घरगुती सिलिंडर कसे उपलब्ध होतात, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. गॅस सिलिंडर वितरक व गॅस डिलिव्हरी करणारे वाहनचालक, डिलिव्हरी बॉय यांचे यात आर्थिक गणित आहे का, अशी शंका नागरिक व्यक्त करत आहेत.
या संदर्भात चिंचवड तसेच परिसरात असलेल्या गॅस वितरकांकडे याबाबत विचारणा केली असता, त्यांनी या प्रकाराची माहिती नसल्याचे सांगत हात वर केले. तर; ज्या ठिकाणी घरगुती सिलिंडरचा वापर केला जातो तेथे सिलिंडर पुरविणाऱ्या व्यक्तीचा संपर्क क्रमांक देण्यास टाळाटाळ करण्यात आली.

जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ व एलपीजी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला जातो. यासंदर्भात पुणे व पिंपरी चिंचवड शहरासाठी पथक नेमले असून सध्या कारवाई सुरू ठेवण्यात येईल. व्यावसायिकांनी घरगुती गॅस सिलिंडर वापरू नये.
- विजय क्षीरसागर, परिमंडळ अधिकारी पुरवठा, ‘फ’ विभाग

सामान्य जनतेला मोठ्या कष्टाने सिलिंडर घरपोच मिळते परंतु; या व्यावसायिकांना तत्पर सेवा देणाऱ्या एजन्सी व त्यातील सामील असलेल्या वितरक व डिलिव्हरी करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे.
- प्रीती जाधव, गृहिणी

नोंदणी झाल्यानंतर गॅस सिलिंडर मिळण्यासाठी दोन ते तीन दिवस लागतात. पण, सायंकाळी व सकाळी ज्या वेळेस शांतता असते, त्या वेळेस या व्यवसायाच्या ठिकाणी हे सिलिंडर देणारे जास्त पैशांच्या आमिषाने उभे असलेले दिसून येतात. त्यांच्यावर प्रथम कारवाई झाली पाहिजे.
- शिरीष साठे, नागरिक

PNE26V83590

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com