काळेवाडीतील महावितरणचा धोकादायक डीपी हलवा

काळेवाडीतील महावितरणचा धोकादायक डीपी हलवा

Published on

काळेवाडी, ता. २३ : येथील आझाद चौकाच्या मुख्य रस्त्यावर असलेला महावितरणचा डीपी सध्या नागरिकांसाठी धोक्याचा ठरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पादचाऱ्यांसह लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेषतः रात्रीच्यावेळी या भागात पुरेशी प्रकाश योजना नसल्यामुळे वाहनचालक व पादचाऱ्यांना डीपी सहज दिसून येत नाही. त्यामुळे कोणत्याही क्षणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाळ्यात डीपीजवळ पाणी साचत असल्याने विजेचा धक्का बसण्याचा धोका अधिक आहे. मात्र याकडे महावितरण कंपनीचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. महावितरणने याकडे तातडीने लक्ष देऊन डीपी सुरक्षित ठिकाणी हलवावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

अपघात घडल्यावर कारवाई करण्यापेक्षा संभाव्य धोका ओळखून आधीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. महावितरणने त्वरीत दखल घेऊन नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे.
- मंदार कुलकर्णी, रहिवासी

डीपी रस्त्याच्या बाजूला असला तरी रस्ता अरुंद असून वाहनांना जाण्यासाठी अडथळा होत आहे. शिवाय अपघाताचा धोका होत आहे.
- प्रभाकर हिंगे, रिक्षा चालक

SVW26A00340

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com