विज्ञान प्रकल्प स्पर्धेत
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

विज्ञान प्रकल्प स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

तळेगाव दाभाडे, ता. १० ः नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्यावतीने प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रकल्प स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी नावीन्यपूर्ण इलेक्ट्रॉनिक रडार प्रणाली, अपंगत्व असणाऱ्या लोकांना संवादाचे तंत्रज्ञान, इकोफ्रेंडली व टाकाऊपासून टिकाऊ वस्तू साहित्य असे विविध प्रकल्प सादर केले होते. सामाजिक जीवनावर परिणाम करणाऱ्या प्रकल्पाची उपयुक्तता व सोपी हाताळणी यावर विद्यार्थ्यांनी विशेष लक्ष दिले होते. या स्पर्धेचे समन्वयक म्हणून विभाग प्रमुख डॉ. शेखर रहाणे व प्रा. हर्षल चौधरी तसेच पर्यवेक्षक म्हणून प्रा. ज्योती गोरे, डॉ. आनंद दौलताबाद व प्रा. अनिरुद्ध डूबल यांनी काम पाहिले. स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय विजेत्यांना रोख पारितोषिके व प्रमाणपत्रे देण्यात आली. तसेच. या स्पर्धेत सादर करण्यात येणाऱ्या प्रकल्पांच्या पेटंट नोंदणीसाठी महाविद्यालयातर्फे प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ. विलास देवतारे यांनी दिली. संस्थेचे अध्यक्ष संजय (बाळा) भेगडे, उपाध्यक्ष गणेश खांडगे, सचिव संतोष खांडगे, सहसचिव नंदकुमार शेलार, खजिनदार तसेच अभियांत्रिकीच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष राजेश म्हस्के, सीईओ डॉ. रामचंद्र जहागीरदार, प्राचार्य डॉ. विलास देवतारे, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. नितीन धवस यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com