हाताचे ठसे उमटेना अन् डोळेही स्कॅन होईना !

हाताचे ठसे उमटेना अन् डोळेही स्कॅन होईना !

Published on

तळेगाव दाभाडे, ता.२७ ः तालुक्यातील रास्त भाव धान्य दुकानदारांना अद्ययावत १८० ई-पॉस यंत्रांचे वाटप करण्यात आले आहे. मात्र, डोळ्यांची शस्त्रक्रिया झाल्याने डोळ्यांचे स्कॅनिंग न होणे, नवीन फोर-जी तंत्रज्ञानयुक्त ई-पॉस यंत्रे अचानक बंद पडणे, सीमकार्ड व्यवस्थित न चालणे यासारख्या अडी-अडचणी रास्त भाव धान्य दुकानदारांना येत आहेत. त्यामुळे, शिधा वाटप करणे म्हणजे ‘नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्ने’ अशी अवस्था झाली आहे.
मावळ तालुक्यात आता शिधापत्रिकाधारकांना त्यांचे डोळे स्कॅन करून रास्त धान्य दुकानातून धान्य मिळणार असून या सुविधेसाठी मावळ तालुक्यातील १८० रास्त भाव धान्य दुकानदारांना अद्ययावत ई-पॉस यंत्रांचे वाटप करण्यात आले. काही जणांच्या हाताच्या बोटांच्या रेषा पुसट होतात. त्याने, धान्य घेताना ठसे उमटले जात नसल्याने शिधापत्रिकाधारकांना धान्यापासून वंचित राहावे लागत होते. त्यामुळे, त्यावर उपाय म्हणून आता ‘आय स्कॅनर’ची (डोळ्यांचे स्कॅन) देखील सुविधा दिली आहे. या यंत्राद्वारे कुटुंबातील सदस्यांची माहिती कळून त्यानुसार धान्य वाटप केले जाते.

आता करायचे काय ?
ज्या शिधापत्रिकाधारकाचे वय ६० पेक्षा अधिक आहे, अशांच्या हाताचे व बोटांचे ठसे उमटत नाही. तसेच डोळ्यांची शस्त्रक्रिया झाली आहे. त्यांच्या डोळ्यांचे स्कॅन होत नाही. त्यामुळे, त्यांना धान्यापासून वंचित राहावे लागत आहे.

फोर-जीची नवीन ई-पॉस यंत्रे मिळाली आहेत. परंतु, ती अचानक बंद पडतात. चालू होण्यास विलंब होतो. डोळ्यांची शस्त्रक्रिया झालेल्या शिधापत्रिकाधारकांना धान्य वाटप करताना नवीन यंत्राचा फायदा होत नाही. 
- बाबुलाल नालबंद, अध्यक्ष, रास्त भाव धान्य दुकानदार संघटना

जी ई-पॉस यंत्रे दिली आहेत. त्यांचे सीमकार्ड चालू नाही. त्यामुळे, दुकानदारांना स्वखर्चाने वायफाय वापरावे लागते. दिलेल्या यंत्रांचा कसा उपयोग करावा ? हे न कळल्याने धान्य वाटप करता येत नाही. 
- अंकुश आंबेकर, कार्याध्यक्ष, रास्त भाव धान्य दुकानदार संघटना

तालुक्यात अद्ययावत १८० ई-पॉस यंत्रांचे वाटप करण्यात आले आहे. ई-पॉस यंत्राला पर्याय म्हणून डोळे स्कॅनिंग यंत्रे दिली आहेत. ज्यांचे ठसे किंवा डोळे स्कॅन होत नाही त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचे ठसे घेता येतात. 
- अंकुश आटोळे, पुरवठा अधिकारी

TDB24B00681, TDB24B00679

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com