नोंदणीकृत ३७८ दिव्यांगांना तळेगाव नगरपरिषदेकडून अनुदानाचे वाटप

नोंदणीकृत ३७८ दिव्यांगांना तळेगाव नगरपरिषदेकडून अनुदानाचे वाटप

Published on

तळेगाव दाभाडे, ता. २७ ः तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या दिव्यांग कल्याण विभागाच्यावतीने शहरातील नोंदणीकृत ३७८ दिव्यांग लाभार्थींना अनुदानाचे वाटप करण्यात आले. प्रत्येक लाभार्थ्याला चालू वर्षातील अनुदानाचा दुसरा हप्ता मिळाला असून प्रत्येक लाभार्थ्याच्या खात्यावर ७ हजार १२२ रूपये वर्ग करण्यात आले आहे. 
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम, उपमुख्याधिकारी ममता राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग कल्याण विभागाचे प्रमुख जयंत मदगे यांनी वाटपाचे नियोजन केले. 
नगरपरिषदेच्यावतीने हद्दीतील दिव्यांगांना दरवर्षी अनुदानाचे वाटप केले जाते. यावर्षी एप्रिल २०२४ पहिला हप्ता तर ऑगस्टमध्ये दुसऱ्या हप्त्याचे वाटप करण्यात आले. यावर्षीच्या अर्थसंकल्पात दिव्यांगांकरिता ८० लाख ९८ हजार रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. 
मदने म्हणाले,‘‘प्रत्येक दिव्यांगाला २०२४, २५ या आर्थिक वर्षात २१ हजार ३६६ रूपये मिळणार असून एप्रिल व ऑगस्ट अशा दोन हफ्त्यांची रक्कम प्रत्येकाच्या खात्यावर जमा झाली असून तिसरा व शेवटचा ७ हजार १२२ रूपयांचा हप्ता मार्चपूर्वी बॅंक खात्यावर जमा होईल.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com