मोबाईलमुळे फुटली खुनाला वाचा !
तळेगाव दाभाडे, ता. १७ ः रात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांनी संशयावरून दोन तरुणांना हटकले. त्यातील एका आरोपीचा मोबाईल फोन तपासला असता त्यामध्ये एक महिला व पुरुष मिळून एका व्यक्तीचा खून करत असल्याचा व्हिडिओ आढळून आला. पोलिसी खाक्या दाखवताच १८ दिवसांपूर्वी झालेल्या एका खुनाचा गुन्हा उघडकीस आला. बहिणीने एका नातेवाईकाच्या मदतीने मावस भावाचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सोमनाथ रघुनाथ काळे असे या प्रकरणातील खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे; तर कविता मारुती शिंदे (वय ४०, रा. ब्राह्मणवाडी, ता. मावळ), मंगेश गोविंद दाभाडे (वय ३६, रा. कोटेश्वरवाडी, ता. मावळ) व तनिष साईनाथ दाभाडे (वय १९, रा. कोटेश्वरवाडी, ता. मावळ) या तीन आरोपींना अटक केली आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट पाचने हे खून प्रकरण उघडकीस आणले.
तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याच्या हद्दीत १३ नोव्हेंबर २०२४ रोजी गस्त घालत असताना पोलिस उपनिरीक्षक राहुल कोळी व त्यांच्या पथकाने संशयास्पद हालचाली करणाऱ्या दोन इसमांना अडवले. आरोपी तनिष साईनाथ दाभाडे याच्या मोबाईलमध्ये एका व्यक्तीच्या खुनाचा व्हिडिओ आढळून आला. व्हिडिओमध्ये एक महिला व पुरुष मिळून सोमनाथचा गळा दाबून खून करत असल्याचे स्पष्ट दिसून आले. चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.
नातेवाईकांच्या मदतीने खून
नाणोली येथे २६ ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या खून प्रकरणात सोमनाथ रघुनाथ काळे यांचा त्यांच्या मावस बहिणीने नातेवाईकांच्या मदतीने खून केल्याचे समोर आले. त्यानंतर, मृतदेहाचा गुपचूप अंत्यविधी करून गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आरोपींनी केला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

