मतदान केंद्र परिसरात मोबाईल नेण्यास मनाई
तळेगाव दाभाडे, ता. १९ ः मतदान केंद्रावर उमेदवार, उमेदवाराचे प्रतिनिधी तसेच मतदारांना मोबाईल घेऊन जाण्यास व वापरण्यास निवडणूक आयोगाने प्रतिबंध केला आहे, अशी माहिती मावळ विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले यांनी दिली.
मतदान केंद्र अधिकारी व निवडणूक आयोगाने परवानगी दिलेले अधिकारी व कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त कोणालाही मतदान केंद्र परिसरात मोबाईल घेऊन येण्यास व वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे मतदारांनी मतदान केंद्रावर येताना सोबत मोबाईल आणू नये, अशी सूचना नवले यांनी केली आहे.
मावळ विधानसभा मतदारसंघात बुधवारी (ता. २०) सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होणार आहे. मतदारांनी मतदान कार्डसह आणखी एक ओळखपत्र घेऊन मतदानासाठी केंद्रावर जावे. मतदारांनी निर्भयपणे बाहेर पडा आणि मतदान करा, असे आवाहन सुरेंद्र नवले यांनी केले आहे.
प्रत्येक मतदान केंद्रावर एक मतदान केंद्र अध्यक्ष आणि तीन सहकारी असतील. ज्या मतदान केंद्रावर १२०० पेक्षा जास्त मतदार आहेत. तिथे एक अतिरिक्त अध्यक्ष असेल. एकूण मावळ मतदार संघात २५०० कर्मचारी मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कार्यरत असल्याचेही नवले यांनी सांगितले.
मावळात ४०२ मतदान केंद्रे
मावळ विधानसभा मतदारसंघात एकूण ४०२ मतदान केंद्र आहे. त्यात एक संवेदनशील मतदान केंद्र आहे. एकूण मतदार हे ३ लाख ८६ हजार १७२ आहेत. तसेच सर्व्हिस वोटर १२९ आहेत. त्यामध्ये १ लाख ९७ हजार ४३६ पुरुष असून १ लाख ८८ हजार ७२३ स्त्रिया आहेत.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

