धरणात बुडून मृत्यूप्रकरणी बंगला, बोट मालकावर गुन्हा
तळेगाव दाभाडे, ता. ७ ः पवना धरणात पाण्यामध्ये बोट उलटून दोन जण बुडून मृत्यूमुखी पडल्याप्रकरणी बंगला आणि बोट मालकावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोटमालक अनिल हरिदास राजवडे (रा. पवनानगर) व हॉटेलमालक पुरोहित चंद्रकांत वंजारी (रा. कुसगाव बुद्रुक) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
मृत तुषार अहिरे याच्या नातेवाइकांनी लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असल्याची माहिती लोणावळा ग्रामीणचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी दिली.
तुषार अहिरे आणि मयूर भारसाके हे मित्रांसोबत बुधवारी (ता. ४) पवना धरण परिसरामध्ये फिरायला आले होते. पवना धरणाच्या बॅकवॉटर परिसरात लेक इस्केप व्हिला या बंगल्यात ते थांबले होते. तेथूनच थेट धरणामध्ये उतरण्यासाठी रस्ता आहे. जलाशयामध्ये एक बोट देखील होती. तुषार अहिरे, मयूर भारसाके त्यांचा मित्र बोट घेऊन पाण्यामध्ये गेले होते. तुषार आणि मयूर हे बोट उलटून पाण्यात पडल्याने बुडून मृत्युमुखी पडले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

