

तळेगाव दाभाडे, ता. १९ ः आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या २१३व्या जयंतीनिमित्त तळेगाव दाभाडे शहर पत्रकार संघातर्फे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संघांचे संस्थापक सुरेश साखवळकर यांनी दिली. आरएमके स्पेसेसच्या वतीने प्रायोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम गुरुवारी (ता. २०) सायंकाळी साडेपाच वाजता योगिराज सभागृहात होणार आहे. दरम्यान, प्रमुख वक्ते, शिक्षण तज्ज्ञ डॉ. न. म. जोशी उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. ज्येष्ठ उद्योजक रामदास काकडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमात माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे व तळेगाव दाभाडे शहर भाजपाचे अध्यक्ष संतोष दाभाडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. या कार्यक्रमास पत्रकार संघातील पदाधिकारी, सदस्य तसेच नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन तळेगाव दाभाडे शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष अतुल पवार, सचिव सोनाबा गोपाळे व पदाधिकाऱ्यांसह सर्व सदस्यांनी केले आहे.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.