तळेगावातील ऐतिहासिक तळ्यातील 
जलपर्णी काढण्यास सुरुवात

तळेगावातील ऐतिहासिक तळ्यातील जलपर्णी काढण्यास सुरुवात

Published on

तळेगाव दाभाडे, ता. ४ ः येथील ऐतिहासिक तळ्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून सांडपाणी जाऊन संपूर्ण तळ्यावर जलपर्णीने वेढा घातला होता. परिसरात मोठी दुर्गंधी पसरली होती. याबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. जलपर्णी काढून साफसफाई करण्याची मागणी नागरिकांनी नगरपरिषदेकडे केली होती. अखेर सोमवारपासून नगरपरिषदेने जलपर्णी काढण्यास सुरवात केली आहे.
या ऐतिहासिक तळ्यात मोठ्या प्रमाणावर जलपर्णी साठली होती. तळ्यातील जलचर मरून पडले होते. परिसरात मोठी दुर्गंधी पसरली होती. डासांचे प्रमाणही वाढले होते. याबाबत स्थानिक नागरिक व पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली होती. या ऐतिहासिक तळ्यातील जलपर्णी काढून साफसफाई करावी, अशी मागणी तीन महिन्यांपासून नागरिकांनी नगरपरिषदेकडे केली होती. अखेर नगरपरिषदेने सोमवारपासून जलपर्णी काढण्यास सुरवात केली आहे. मावळ तालुका मच्छीमार संघटना, तळेगाव येथील भोई समाजातील नागरिकांनी जलपर्णी काढण्यास मदत केली. संपूर्ण तळ्यातील जलपर्णी काढण्यास दोन ते तीन महिने लागणार आहेत. 

‘‘जलपर्णी काढून पाण्याची गुणवत्ता सुधारणे, एरिएटर करणे, तळ्यामध्ये कारंजे उभारणे आदी पर्यावरणबाबी करण्यास पणन मंडळाने परवानगी दिली आहे. त्यानुसार सोमवारपासून तळ्यातील जलपर्णी काढण्यास सुरवात केली आहे.’’
- तुकाराम मोरमारे, आरोग्य निरीक्षक, तळेगाव दाभाडे नगरपरिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com