नवीन रस्ता किमान पाच वर्षे टिकलाच पाहिजे

नवीन रस्ता किमान पाच वर्षे टिकलाच पाहिजे
Published on

तळेगाव दाभाडे, ता. १४ : नव्याने बनवलेला रस्ता किमान पाच वर्षे टिकलाच पाहिजे. निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका, अशी मागणी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील शेळके यांनी केली.
आमदार शेळके यांनी विविध महत्त्वाच्या विषयांवर परखड मते मांडली. मावळ मतदारसंघातील रस्ते विकास, आरोग्य सुविधा, सरकारी योजनांची अंमलबजावणी आणि उद्योग क्षेत्रातील समस्या यावर त्यांनी सविस्तर भाष्य केले.
आमदार शेळके म्हणाले, ‘‘गेल्या १५ वर्षांपासून रखडलेला रस्ते विकासाचा प्रश्न आता मार्गी लागला आहे. अनेक उद्योगपती, स्थानिक नागरिकांनी या कामाचे कौतुक करत सरकारचे आभार मानले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून विविध योजनांतर्गत रस्ते बांधले जात आहेत. मात्र, या रस्त्यांची गुणवत्ता टिकाऊ असली पाहिजे. काही रस्त्यांचे काम होताच ते वर्षभरातच खराब होतात, रस्ते खड्ड्यांनी भरतात. ठेकेदारांना जबाबदारीने काम करायला लावण्याची गरज आहे. तसे न करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई केली पाहिजे. तसेच, जो ठेकेदार वेळेत दर्जेदार काम करेल, त्याला प्रोत्साहन मिळाले पाहिजे.’’

खासगी रुग्णालयांतही मोफत उपचार मिळावेत
राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी ३,८२७ कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचे त्यांनी सांगितले. ‘रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा’ या भावनेतून सरकार आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्नशील आहे. मावळ मतदारसंघातील कान्हे रोड येथील सरकारी हॉस्पिटल अंतिम टप्प्यात असून, तिथे लवकरच डॉक्टरांची भरती होणार आहे. त्याचबरोबर, मुख्यमंत्री सहायता निधी गरीब रुग्णांसाठी तारणहार ठरत आहे. मात्र, खासगी रुग्णालयांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांवर आळा घालण्याची गरज आहे. अनेक रुग्णालये अचानक बिल वाढवितात, नातेवाइकांना योग्य माहिती दिली जात नाही. त्यामुळे, ‘जर रुग्ण वाचला, तर सरकार त्याचे पूर्ण बिल भरेल आणि जर तो दैवयोगाने दगावला, तर त्याचे संपूर्ण बिल माफ झाले पाहिजे.’

फोटो आमदार सुनील शेळके

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com