अर्ज माघारीची मुदत उलटूनही ‘बिनविरोध’चे गुऱ्हाळ

अर्ज माघारीची मुदत उलटूनही ‘बिनविरोध’चे गुऱ्हाळ

Published on

तळेगाव दाभाडे, ता. २५ : श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणुकीत अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी अर्ज दाखल होत राहिले. त्यामुळे बिनविरोध होण्याची अधिकृत घोषणा मंगळवारी (ता.२५) होऊ शकली नाही. दरम्यान, श्री संत तुकाराम शेतकरी विकास सर्वपक्षीय पॅनेलच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना संस्थापक चेअरमन नानासाहेब उर्फ (विदुरा) नवले यांच्या नेतृत्वामध्ये संचालक मंडळ निवडणुकीची बैठक पार पडली. यात सन २०२५-२०३० या पाच वर्षांसाठी जुन्या-नव्यांचा समन्वय साधत माजी खासदार नानासाहेब नवले व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश घुले यांच्या स्वाक्षरी असेलेली उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. दरम्यान, अर्ज माघारी घेण्यासाठी मंगळवारी दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत होती. मात्र, वेळ संपूनही चर्चा सुरूच राहिली.
नवीन २१ संचालकाच्या यादीमध्ये जुन्यांमधील विदुरा नवले, चेतन भुजबळ, बापूसाहेब भेगडे, ज्ञानेश्वर तथा माऊली दाभाडे, अनिल लोखंडे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर, १६ नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आलेली आहे.
दरम्यान, अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी मुळशीतील काही अर्ज राहिले होते. त्यामुळे मंगळवारी बिनविरोधची घोषणा होऊ शकली नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. त्यामुळे ही घोषणा बुधवारी (ता.२६) होण्याची शक्यता आहे.

उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी अर्ज माघार घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे अंतिम यादी जाहीर करता आली नाही. ती बुधवारी प्रसिद्ध करण्यात येईल.
- मुकुंद पवार, निवडणूक निर्णय अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com