

तळेगाव दाभाडे, ता.३१ ः पुणे - मुंबई द्रुतगती महामार्ग मार्गावर ताजे गावच्या हद्दीत उभ्या असलेल्या टेम्पोला ट्रकने जोरदार धडक दिली. त्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी पहाटे झाला. अजय कन्हैयालाल यादव (वय २५, रा.कुर्ला मुंबई), अफजल मुर्तूजा खान (वय ३९, रा.उत्तर प्रदेश) अशी मृतांची नावे आहेत. कामशेत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे - मुंबई द्रुतगती महामार्गावर मुंबई बाजूकडे जाणाऱ्या मार्गिकेवर कोंबड्यांची वाहतूक करणारा टेम्पो (क्रमांक एमएच ०१ डीआर ७५६७) रस्त्याच्या कडेला उभा होता. त्याला लेलॅड मिक्सर वाहन (क्रमांक एमएच ४६ बीयु ५६९७) चालक राजेश यादव (वय ३०) याने दुर्लक्ष करून टेम्पोला धडक दिली. या प्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.