

तळेगाव दाभाडे, ता. १६ ः कुंडमळा येथील पूल कोसळल्याने शेलारवाडी आणि कुंडमळा या दोन गावांचा मुख्य रस्त्याशी संपर्क
तुटला आहे. या घटनेमुळे स्थानिक ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून, शाळा, आरोग्यसेवा आणि दळणवळणाच्या सोयीवर मोठा परिणाम झाला आहे. आठ ते दहा किलोमीटर वळसा घालून ये-जा करण्याची त्यांच्यावर वेळ आली आहे.
कुंडमळा येथील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे शेलारवाडी आणि कुंडमळा या गावांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे या मार्गावरून दररोज विद्यार्थी, शेतकरी, महिला व ज्येष्ठ नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर वावर असतो. पूल कोसळल्यामुळे आता या नागरिकांना ८ ते १० किमीचा वळसा घालून दुसऱ्या मार्गाने प्रवास करावा लागत आहे. गेल्या काही वर्षांपासून या पुलाची अवस्था अत्यंत जीर्ण झाल्याची तक्रार ग्रामस्थ वारंवार प्रशासनाकडे करत होते. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे.
काही ग्रामस्थांनी सांगितले की, हा पूल हा आमच्या दोन्ही गावांचा जीवनवाहिनी आहे. आरोग्यसेवा, शिक्षण, शेतीचे व्यवहार या सगळ्या गोष्टींसाठी याच पुलावर आम्ही विसंबून होतो. प्रशासनाने वेळेत लक्ष दिले असते तर ही दुर्घटना टाळता आली असती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.