ढाब्यावरील हाणामारीप्रकरणी सात जणांना कोठडी
तळेगाव दाभाडे, ता. २५ : नायगाव येथील टोनी द ढाबा या हॉटेलमध्ये सोमवारी दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. या प्रकरणी दोन्ही गटांतील सात जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांना बुधवारी (ता.२५) वडगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २७ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिलकुमार बागला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सिद्धे विजयकुमार चावला आणि अन्य दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. तर, दीपाली देसाई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनिलकुमार बागला, एक महिला, नामदेव चोपडे, तितु सेजवाल यांना अटक करण्यात आली आहे. नायगाव येथील टोनी द ढाब्याचे मालक विजय चावला यांच्या मृत्यूनंतर सदर हॉटेल आणि अन्य संपत्तीबाबत या दोन्ही कुटंबांत वाद सुरू आहेत. यातून दोन्ही गटांत हाणामारीचा प्रकार सोमवारी (ता.२५) घडला होता. अधिक तपास प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र मायणे करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

