‘प्लास्टिकमुक्त तळेगाव’ हे सामूहिक ध्येय

‘प्लास्टिकमुक्त तळेगाव’ हे सामूहिक ध्येय

Published on

तळेगाव दाभाडे, ता. ३० : ‘प्लास्टिकमुक्त तळेगाव’ हे आपले सामूहिक ध्येय आहे. सर्व नागरिकांनी सहकार्य करून पर्यावरण संवर्धनात आपले योगदान द्यावे,’’ असे आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजय सरनाईक यांनी केले.
तळेगाव नगर परिषद आणि रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे यांच्या विद्यमाने ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत प्लास्टिकमुक्त तळेगाव दाभाडे जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. यात नागरिक, विद्यार्थी, शिक्षक, सामाजिक संस्था आणि पोलिस प्रशासनाने सहभाग नोंदवला.
व्यासपीठावर उपमुख्याधिकारी ममता राठोड, शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी शिल्पा रोडगे, रोटरी सहप्रांतपाल दीपक फल्ले, माजी अध्यक्ष किरण ओसवाल, स्माइल व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक हर्षल पंडित, माजी नगरसेवक अरुण माने, राकेश ओसवाल व विनोद राठोड उपस्थित होते.
रोटरी क्लबचे अध्यक्ष संतोष परदेशी यांनी प्लास्टिकला पर्याय स्वीकारण्याचे आवाहन केले, तर ममता राठोड यांनी विद्यार्थ्यांना प्लास्टिक मुक्तीची शपथ दिली. शिल्पा रोडगे यांनी शाळांमधून प्लास्टिक संकलन करून त्याचे पुनर्वापरासाठी नियोजन करण्याची ग्वाही दिली.
रॅलीमध्ये नगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनी चौकाचौकात पथनाट्य व घोषवाक्यांद्वारे जागृती केली. ‘महात्मा गांधी’ आणि ‘भस्मासूर राक्षस’ ही साकारलेली रुपे विशेष आकर्षण ठरली.
घोषवाक्य स्पर्धेत प्रथम : सिद्धी रंजवे : संत ज्ञानेश्वर शाळा, द्वितीय : समृद्धी शेंद्रे : उमाबाई दाभाडे शाळा, तृतीय : राहुल पुजारी : लोकमान्य टिळक शाळा यांनी क्रमांक पटकावला. टेक्नोवेस कंपनीच्या निखिल महापात्रा यांनी सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कविता खोल्लम, सूत्रसंचालन प्रशांत ताये यांनी तर प्रदीप टेकवडे यांनी आभार मानले.

TDB25B03177

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com