माजी आमदार कृष्णराव भेगडे यांची श्रद्धांजली सभा

माजी आमदार कृष्णराव भेगडे यांची श्रद्धांजली सभा

Published on

तळेगाव दाभाडे, ता. २ : मावळचे माजी आमदार, शिक्षणमहर्षी, ज्येष्ठ नेते कृष्णराव धोंडिबा भेगडे यांचे ३० जून रोजी निधन झाले. भेगडे हे मावळातील राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील परिवर्तनाचे साक्षीदार आणि मार्गदर्शक होते. त्यांच्या कुशल नेतृत्वातून मावळने राज्याच्या नकाशावर आपली ठळक छाप उमटवली. त्यांच्या स्मृतींना अर्पण करण्यासाठी शनिवार, दि. ५ जुलै रोजी सकाळी १० वाजता नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या इंजिनिअरिंग कॉलेज सभागृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. आपण सर्वांनी या सभेस उपस्थित राहून कै. भेगडे साहेबांच्या स्मृतींना उजाळा द्यावा, असे आवाहन गणेश खांडगे यांनी केले आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com