विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत तळेगावमध्ये संयुक्त बैठक

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत तळेगावमध्ये संयुक्त बैठक

Published on

तळेगाव दाभाडे, ता.३ ः शाळा व परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा बसविणे, सर्व कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी अनिवार्य करणे, लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण (पोक्सो कायदा २०१२) अंमलबजावणी करणे आदी विषयांवर तळेगाव कार्यक्षेत्रातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांचे प्रमुख यांची संयुक्त बैठक नुकतीच पार पडली.
तळेगाव दाभाडे नगरपरिषद शिक्षण मंडळ, तळेगाव दाभाडे पोलिस ठाणे, वाहतूक विभाग, पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ही बैठक बोलविण्यात आली. या बैठकीस तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, वरिष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैय्या थोरात, वाहतूक शाखेचे वरिष्ठ उपनिरीक्षक गणेश लोंढे, प्रशासन अधिकारी शिल्पा रोडगे आदी उपस्थित होते. लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण (पोक्सो कायदा २०१२) अंमलबजावणी करणे, प्रत्येक शाळेत तक्रारपेटी स्थापन करणे, शाळा व परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा बसविणे, सर्व कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी अनिवार्य करणे, शालेय वाहनांची सुरक्षा व नियमन, विद्यार्थ्यांच्या एकूण सुरक्षेसाठी उपाय योजना, विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक बाबी व त्यावरील दक्षता आदींवर बैठकीत सूचना देण्यात आल्या. मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी वाहतूक कोंडीच्या समस्येवर लवकरच उपाययोजना राबविण्याची ग्वाही दिली. केशव चिमटे यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com