कामशेत घाटातील अपघातात दोन दुचाकीस्वार तरुण ठार

कामशेत घाटातील अपघातात दोन दुचाकीस्वार तरुण ठार
Published on

तळेगाव दाभाडे, ता.२ ः जुन्या पुणे - मुंबई महामार्गावरील कामशेत घाटात बुधवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातामध्ये दोन दुचाकीस्वार तरुणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी, पिकअप वाहनाच्या चालकावर कामशेत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आकाश जयलाल चौधरी (वय १९, रा. शिवणे, वारजे, पुणे) व प्रज्वल ज्ञानेश्वर सराफ (वय २३, रा. औंध आयटीआय कॉलेज हॉस्टेल, हडपसर, पुणे) अशी मृतांची नावे आहेत. या प्रकरणी ऋषभ विनोद हिवाळे (वय २३, रा. केशवनगर, वडगाव मावळ) यांनी कामशेत पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून प्रदीप मुकुंदा पाटील (वय ४४, रा. दिघी, पुणे; मूळगाव पिंपळखुटा, ता. मलकापूर, जि. बुलढाणा) या पिकअप चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, त्याचे मित्र आकाश चौधरी व प्रज्वल सराफ हे दुचाकीवरुन (एमएच १२ - एक्सबी - ००३८) लोणावळ्याकडे जात होते. त्यावेळी पावसामुळे दुचाकी घसरून ती दुभाजकाला आदळली व दोघेही रस्त्यावर पडले. त्याचवेळी लोणावळ्याहून भरधाव वेगात आलेल्या महिंद्रा पिकअप (एमएच १४ - एलबी ७६२८) वाहनाच्या चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवत या दोघांना चिरडले. गंभीर जखमी झाल्याने घटनास्थळीच दोघांचा दुदैवी मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com