आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट

आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट

Published on

तळेगाव दाभाडे, ता. ४ : मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट रचल्याचे समोर आले आहे. या संदर्भात शेळके यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडत प्रश्न उपस्थित केले. यावर गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी ‘‘या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्याचा निर्णय सात दिवसांत घेऊ,’’ अशी माहिती दिली.

‘‘पिंपरी-चिंचवड पोलिसांनी २६ जुलै २०२३ रोजी तळेगाव दाभाडे परिसरात एक कारवाई केली होती. यामध्ये तपासाअंती सात सराईत गुन्हेगारांना अटक केली. ज्यांच्याकडून नऊ पिस्तूल, ४२ काडतुसे, कोयते जप्त करण्यात आले. दरम्यान, या शस्त्रांचा वापर आमदार शेळके यांच्या हत्येसाठी होणार होता, अशी माहिती या आरोपींनी पोलिसांना दिली,’’ असा दावा करत ‘‘हे आरोपी मध्यप्रदेश, जालना, वडगाव, काळेवाडी परिसरातील आहे. त्यांच्याशी माझे वैर नव्हते. त्यामुळे या गुन्हेगारांमागे कोणीतरी शक्तिशाली सूत्रधार आहे,’’ असा संशय शेळके यांनी विधानसभेत व्यक्त केला.

कटाचा सूत्रधार कोण? : शेळके
‘‘ही टोळी सामान्य कुटुंबातील आहे. तरीही, त्यांच्याकडे पिस्तूल, कोयते खरेदीसाठी पैसे कोठून आले?, ज्या नामांकित वकिलांनी आरोपींची बाजू घेतली त्यांचे शुल्क लाखोंच्या घरात होते. हे पैसे कोण पुरवतेय?, या कटाचा सूत्रधार कोण?, असे प्रश्न शेळके यांनी उपस्थित केले.

सखोल तपास होणार : कदम
या सात गुन्हेगारांपैकी काहींना शस्त्र पुरवणारा ‘देवराज’ नावाचा मध्यप्रदेशातील असून त्याची माहितीही संबंधित राज्य सरकारला दिली आहे. या प्रकरणाचा सूत्रधार आणि पैसे पुरवणाऱ्याचा छडा लावण्याचे आश्वासन गृह राज्यमंत्री कदम यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com