वीज ग्राहक संघटनेची कामशेतमध्ये उद्या बैठक
तळेगाव दाभाडे, ता. ४ ः महावितरणविषयी वेगवेगळ्या समस्या आणि तक्रारींबाबत आवाज उठविण्यासाठी कामशेतमध्ये बुधवारी (ता. ६) वीज ग्राहक संघटनेच्या मावळ तालुका शाखेने बैठक आयोजित केली आहे. वीज वापर कमी असूनही देयक जास्त रकमेचे येते. अनेक प्रकरणांमध्ये सवलत न देता वीज जोडणी तोडली जाते. तक्रारी केल्या तरी अधिकारी अरेरावीची भाषा वापरतात. वीजपुरवठा अचानक खंडित होतो. दुसरीकडे काही कंपन्यांनी काही वर्षे भरणा केला नाही तरी कारवाई होत नाही, असे संघटनेचे आरोप आहेत. ही बैठक सहा ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता कामशेतमधील गणेश मंगल कार्यालयात होईल. या बैठकीस भाई भरत मोरे, विलास भटेवरा, राजू बेदमुथा, गुलाब तिकोने, निवृत्ती दळवी, तानाजी दाभाडे, सुभाष रायसोनी, सचिन रावळ आदी उपस्थित राहतील. वीज ग्राहकांनी बैठकीस वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेने केले आहे.
-----