वडगाव-मावळला होणार नवे न्यायालयीन भवन
तळेगाव दाभाडे, ता. २५ ः वडगाव मावळ येथील जुन्या न्यायालयीन इमारतीच्या जागी नवे अत्याधुनिक न्यायालयीन भवन उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाच्या विधी व न्याय विभागाने या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता दिली आहे. इमारतीच्या उभारणीसाठी १०९ कोटी आठ लाख रुपयांचा खर्च होणार आहे.
या भवनात तळमजल्यासह नऊ मजले असतील. यात २० कक्ष असतील. वाढत्या कामकाजासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होतील. शासन निर्णयानुसार बांधकाम सुरू करण्यापूर्वी वास्तुविशारदांकडून नमुना नकाशा, मांडणी नकाशा व सविस्तर आराखड्यांना मंजुरी घेणे बंधनकारक असेल. अंतिम अंदाजपत्रकावर जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे यांची सहमती आवश्यक आहे. पर्यावरण विभागाची २०१४ ची मार्गदर्शक तत्त्वे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या २०१७ च्या नियमावलीनुसार सर्व प्रक्रिया राबविणे अपेक्षित आहे.
या कामासाठी एकच निविदा काढण्याचा निर्देश आहेत. बांधकामाच्या व्याप्तीत परस्पर बदल करता येणार नाहीत. नवीन कामांचा समावेश किंवा बदल करण्यासाठी लेखी आदेश आवश्यक राहील; अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली जाईल. या इमारतीसाठीचा खर्च "सार्वजनिक बांधकामावरील भांडवली खर्च" या लेखाशाखेतून करण्यात येणार आहे. तरतूद उपलब्ध झाल्याशिवाय कामाला सुरवात करता येणार नाही.
हा निर्णय २५ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झाला आहे. शासन सल्लागार (विधी) विलास गायकवाड यांच्या स्वाक्षरीने आदेश जाहीर करण्यात आला. यामुळे तालुक्यातील न्यायालयीन कामकाज अधिक कार्यक्षम, आधुनिक व नागरिकांसाठी सुलभ होण्याची अपेक्षा आहे.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.