नगरपरिषदेमार्फत उभारलेल्या केंद्रांवर 
मूर्ती विसर्जन, मूर्तीदान करा

नगरपरिषदेमार्फत उभारलेल्या केंद्रांवर मूर्ती विसर्जन, मूर्तीदान करा

Published on

तळेगाव दाभाडे, ता. २६ ः गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी व जलप्रदूषण रोखण्याच्या अनुषंगाने नागरिकांनी गणेशमूर्तीचे विसर्जन तलाव, विहीर, नदी व इतर नैसर्गिक जलस्रोतांमध्ये न करता नगरपरिषदेमार्फत उभारण्यात आलेल्या केंद्रावर मूर्ती विसर्जन किंवा मूर्तीदान करावे, असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी केले आहे.
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेमार्फत शहरातील नागरिकांच्या सोयीकरिता शहरामध्ये विविध ठिकाणी मूर्ती विसर्जन आणि मूर्तीदान केंद्र उभारण्यात आली आहेत. तसेच, ज्या नागरिकांना घरी मूर्तीचे विसर्जन करावयाचे आहे अशा नागरिकांना नगरपरिषदेमार्फत नगरपरिषद कार्यालय व संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा क्र. ६ या दोन ठिकाणी अमोनियम बायकार्बोनेट पावडरचे मोफत वाटप करण्यात येत आहे. गणेशोत्सव काळात निर्माण होणारे निर्माल्य संकलन करण्यासाठी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागामार्फत दररोज ट्रॅक्टरद्वारे निर्माल्य कलश फिरविण्यात येणार आहे. तसेच, मूर्तीदान केंद्राच्या ठिकाणीही निर्माल्य कलश ठेवण्यात आले आहेत. शहरातील नागरिकांनी व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी निर्माल्य इतरत्र न टाकता निर्माल्य कलशात टाकावे, असे आवाहन नगरपरिषदेमार्फत करण्यात येत आहे.

मूर्तीदान, विसर्जन केंद्र पुढीलप्रमाणे
- नगरपरिषद कार्यालयामागील नथूभाऊ भेगडे पाटील शाळेचे मैदान
- गाव तळे - अमर खडकेश्वर मंदिराजवळ
- जुनी नगरपरिषदेसमोर - शिव शंभू स्मारक
- यशवंतनगर (गोल ग्राउंड)
- संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा क्र. ६ (गुलाबी शाळा)
- डी-मार्ट शेजारील ईगल तळे
- डाळ आळी

मूर्तीदान केंद्र
- नगरपरिषद कार्यालय
---

Marathi News Esakal
www.esakal.com