तळेगावात अखेर भाजप-राष्ट्रवादी युतीची घोषणा
तळेगाव दाभाडे, ता. १३ ः तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीने २८ उमेदवारांची नावे शुक्रवारी (ता. १३) जाहीर केली.
भाजपचे माजी मंत्री बाळा भेगडे आणि आमदार सुनील शेळके या मामा-भाचा जोडीने युतीबाबत अखेर तळेगावमध्ये हस्तांदोलन केले. लोणावळा आणि वडगाव मावळ येथे या दोन पक्षांची युती झाली नाही, त्यामुळे तळेगावमध्ये युती होणार की नाही, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती. या पार्श्वभूमीवर शहराच्या विकासासाठी दोघांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून पत्रकार परिषदेत युतीची घोषणा केली. यावेळी गणेश खांडगे, गणेश भेगडे, सुधाकर शेळके, संतोष दाभाडे, सुरेश धोत्रे, गणेश काकडे, चिराग खांडगे, सुहास गरुड आदी उपस्थित होते.
नगराध्यक्ष पदासाठी आधी भाजपचे संतोष हरिभाऊ दाभाडे आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेश मोहनराव काकडे या दोघांना प्रत्येकी अडीच वर्षे अशी समान संधी देण्याचा ठराव झाला. राष्ट्रवादी काँग्रेसने घड्याळ, तर भाजपने कमळ या चिन्हावर निवडणूक लढविण्याचाही ठराव झाला.
तळेगाव नगरपरिषदेत एकूण २८ सदस्य आहेत. यात राष्ट्रवादी काँग्रेसला १७, तर भाजपला ११ असे जागावाटपाचे सूत्र ठरले. राष्ट्रवादीचे उर्वरित तीन, तर भाजपचे चार अशा सात उमेदवारांची नावे शनिवारी (ता. १४) जाहीर करण्यात येतील.
उमेदवारांची नावे ः
राष्ट्रवादी काँग्रेस ः प्रभाग क्रमांक १ ः आशा अशोक भेगडे, २ ः संदीप बाळासाहेब शेळके, ३ ः सिद्धार्थ गोरख दाभाडे, ४ ः गणेश मोहनराव काकडे, ५ ः भारती सुरेश धोत्रे, ६ ः शैलेजा कैलास काळोखे, ७ ः सत्यम गणेश खांडगे, ८ ः मनिषा हनुमंत म्हाळसकर, ९ ः हेमलता चंद्रभान खळदे, १० ः संगीता सतीष खळदे, मदन ऊर्फ मजनू हनुमंत नाटेकर, ११ ः कमल नामदेव टकले, १२ ः सोनाली गौरव दरेकर, संतोष छबूराव भेगडे
--
भाजप ः प्रभाग क्रमांक १ ः निखिल उल्हास भगत, २ ः विभावरी रवींद्रनाथ दाभाडे, ३ ः प्रिया विकी लोखंडे, ४ ः सिया लक्ष्मण चिमटे, ६ ः चिराग सुरेश खांडगे, ११ ः इंद्रकुमार राजमल ओसवाल, १२ ः विनोद अशोक भेगडे.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

