द्रुतगती मार्गावरील अपघातात कंटेनरचालकासह दोघांचा मृत्यू
तळेगाव दाभाडे, ता. २३ ः मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ताजे पेट्रोल पंपाजवळ रविवारी पहाटे पावणे चार वाजण्याच्या सुमारास भीषण अपघातात कंटेनर चालकासह दोघांचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. पुण्याहून मुंबईकडे जाणारा कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुभाजक ओलांडून पलीकडील मार्गिकेमध्ये घुसला. त्याची धडक मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या मोटारीला बसली.
या अपघातात कंटेनर चालक अनुराग जगदीश गडवा (रा. चक्कर घट्टा, चंदौली, उत्तर प्रदेश) आणि मोटारीतील प्रवासी विवेक सुरेंद्र प्रतापसिंह (वय ३०, रा. फैजाबाद, उत्तर प्रदेश) यांचा जागीच मृत्यू झाला. मोटारीतील शुभम शुक्ला (वय ३२, रा. खारघर, नवी मुंबई), ऋतुराज परमहंस जयस्वाल (वय ३२, रा. तुर्भे, मुंबई), अवधेश यादव (वय ३३) आणि कंटेनरमधील राहुल राजेंद्र यादव (वय २१, रा. वाराणसी) गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी तळेगाव दाभाडे येथील सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले.
अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. याप्रकरणी मृत कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे कामशेत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांनी सांगितले.
-----
फोटो
70448
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

