तळेगावात मतदानासाठी प्रशासन सज्ज

तळेगावात मतदानासाठी प्रशासन सज्ज

Published on

तळेगाव दाभाडे, ता. १ : तळेगाव दाभाडे नगर परिषद निवडणुकीसाठी मंगळवारी (ता.२) मतदान होणार आहे. यात १४ प्रभागांतील ७१ मतदान केंद्रांवर तयारी पूर्ण करण्यात आली आहे. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
मतदारांना कोणतीही गैरसोय होऊ नये, विशेषतः दिव्यांग, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचे मतदान सुलभ व सुरळीत व्हावे यासाठी तयारी पूर्ण केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना तांबे तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गिरीश दापकेकर यांनी दिली.
प्रत्येक प्रभागातील १४ मतदान केंद्रांवर ‘हिरकणी कक्ष/पाळणाघर’ उभारण्यात आले आहे. येथे स्तनदा माता, गर्भवती, बालकांना सुविधा आहे. ज्येष्ठ मतदारांना गरजेनुसार आवश्यक मदत मिळणार आहे. या सेवेसाठी १८ अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची नियुक्ती केली आहे. प्रत्येक केंद्रावर प्राथमिक उपचार किटची सोय करण्यात आलेली आहे. तेथे २८ आशा सेविका कार्यरत राहणार आहेत. दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प, व्हीलचेअर आणि मार्गदर्शनासाठी दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. मतदारांना मदत व मार्गदर्शन करण्यासाठी २० स्वयंसेवक नियुक्त केले आहेत. मतदान केंद्रांवर सावलीची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सुविधा, वीजपुरवठा, मदत कक्ष आणि स्वच्छतागृहांची सोय यांसह सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

TDB25B04303

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com