‘असे दादा पुन्हा होणे नाही, मिळणे नाही’

‘असे दादा पुन्हा होणे नाही, मिळणे नाही’

Published on

तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्यातील प्रामाणिक कार्यकर्त्यांना बळ देत त्यांना नेतृत्वाच्या केंद्रस्थानी आणणारे, विकासाला स्पष्ट दिशा देणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन सर्वांनाच सुन्न करणारे आहे. मावळातील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना अजितदादांनी मानाची पदे दिली. त्यातूनच कार्यकर्ते आणि पक्षही मोठा झाला. पण, अजितदादांच्या निधनाने ‘असे दादा पुन्हा होणे नाही, मिळणे नाही’ अशी भावना हे पदाधिकारी व्यक्त करत आहेत.
मावळ तालुक्यात सलग तीस वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार नव्हता. दहा वर्षांपूर्वी सुनील शेळके हे विधानसभेसाठी इच्छुक होते. त्या वेळी भाजपने उमेदवारी नाकारली. पण, अजित पवार यांनी शेळके यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी दिली. शेळके यांनी ९० हजार मतांच्या फरकाने विजय मिळवत मावळाला पुन्हा राष्ट्रवादीचा आमदार दिला. २०२४ मध्येही अजित पवार यांनी विश्वास दाखवत शेळके यांना पुन्हा उमेदवारी दिली. यातही शेळके लाखाहून अधिक मतांच्या फरकाने विजयी झाला.
माजी आमदार कृष्णराव भेगडे, मदन बाफना, माऊली दाभाडे यांच्याशी अजित पवार यांचे घनिष्ठ संबंध होते. वयाने मोठ्या नेत्यांचा सन्मान राखत त्यांच्या अनुभवाचा पक्ष आणि तालुक्याच्या विकासासाठी उपयोग करून घेण्याची भूमिका त्यांनी कायम घेतली. नव्या पिढीतील कार्यकर्त्यांना संधी देत त्यांना जबाबदारी देण्याचे कामही त्यांनी सातत्याने केले.
मावळातील ज्येष्ठ नेते माउली दाभाडे यांना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपद, बापूसाहेब भेगडे यांना संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्षपद, तसेच विधानसभेची उमेदवारी दिली, बाळासाहेब नेवाळे यांना पुणे जिल्हा दूध संघाचे अध्यक्षपद देण्यात आले.
तर, अजित पवार हे पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष असताना बबनराव भेगडे यांना उपाध्यक्षपदाची संधी देऊन पुढे अध्यक्षपदाची जबाबदारीही देण्यात आली. पुणे जिल्हा परिषदेत आशिष परदेशी यांना समाजकल्याण समितीचे सभापती, बाबुराव वायकर यांना कृषी समितीचे सभापतीपद देत कार्यकर्त्यांना निर्णयप्रक्रियेत स्थान देण्यात आले. गणेश ढोरे, गणेश खांडगे, विठ्ठलराव शिंदे यांसारख्या अनेक कार्यकर्त्यांना तालुका व जिल्हा पातळीवरील महत्त्वाची पदे देत संघटना मजबूत करण्यात आली.
नेतृत्व म्हणजे केवळ पद नव्हे, तर कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, हे अजित पवार यांनी कृतीतून दाखवून दिले. त्यांच्या जाण्याने मावळ तालुक्यात राजकीय व विकासात्मक पातळीवर मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मात्र त्यांनी दिलेली दिशा, उभारलेली विकासकामे आणि घडवलेली नेतृत्वाची पिढी हीच त्यांची खरी ओळख राहील, अशी प्रतिक्रिया मावळातील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com