एक कोटीच्या कर्जासाठी बँकेत
गहाण ठेवलेल्या सदनिकांची विक्री

एक कोटीच्या कर्जासाठी बँकेत गहाण ठेवलेल्या सदनिकांची विक्री

Published on

तळेगाव दाभाडे, ता. ११ ः वडगाव मावळ येथील ‘साई अनिरुद्ध धाम’ या निवासी व व्यावसायिक प्रकल्पाच्या बँकेत गहाण ठेवलेल्या सदनिका ग्राहकांना विकून त्यांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एस. एम. डब्ल्यू. बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्सचे विकसक सतीश महेश वाघेला व महेश मोहन वाघेला (दोघे रा. निगडी प्राधिकरण, पुणे) यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दोन्ही आरोपी फरार झाले आहेत.
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, सर्व्हे नं. ६३/७ मधील प्लॉट नं. १९ व २० येथे ‘साई अनिरुद्ध धाम’ या प्रकल्पाची जाहिरात करून सदनिकांची विक्री करण्यात आली. १०१, १०२ व १०५ या क्रमांकांच्या सदनिकांचा व्यवहार करून संबंधित ग्राहकांकडून पूर्ण रक्कम स्वीकारण्यात आली. त्याचे नोंदणीकृत करारनामेही करण्यात आले. या प्रकल्पातील अनेक सदनिका तसेच व्यापारी गाळे नांदेड मर्चंट बँकेच्या पुण्यातील कर्वे रोड शाखेत सुमारे एक कोटी रुपयांच्या कर्जासाठी गहाण ठेवण्यात आल्याचे उघड झाले. ही माहिती जाणीवपूर्वक लपवून विकसकांनी सदनिकांची विक्री करून ग्राहकांकडून संपूर्ण रक्कम घेतली व त्यांना ताबा दिला. आता सदनिकाधारकांवर बँकेकडून जप्तीची कारवाई होण्याची भीती निर्माण झाली आहे.
बांधकाम पूर्णत्वाचा दाखला व भोगवटा प्रमाणपत्र न घेता सदनिका हस्तांतरित केल्याचे आणि ग्राहकांकडून मिळालेली रक्कम स्वतंत्र खात्यात न ठेवता अपहार केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे ग्राहकांचा विश्वासघात व आर्थिक नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र मालकी हक्काच्या सदनिकांबाबतच्या अधिनियमांतर्गत विविध कलमांन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार डोईजड व पोलिस हवालदार विशाल जांभळे अधिक तपास करीत आहेत. आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
---
फोटो
04628

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com