तळेगावात मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी ‘अभय योजना’
तळेगाव दाभाडे, ता. १३ : नगर परिषद हद्दीतील मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी शासनाच्या ‘अभय योजने’ची अंमलबजावणी चालू आर्थिक वर्षात करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत १९ मे २०२५ अखेर थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांवर आकारण्यात आलेल्या दोन टक्के दंडात्मक व्याजावर शंभर टक्के सूट देण्याचा प्रस्ताव नगर परिषदेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला आहे.
सन २०२५-२६ अखेरपर्यंत मालमत्ता कराचा भरणा करताना मागील वर्षांच्या थकबाकीवरील दंडात्मक व्याज माफ करून केवळ मूळ कराची रक्कम भरण्याची संधी नागरिकांना उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त थकबाकीदारांनी या योजनेचा लाभ घेऊन त्वरित कर भरणा करावा, असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाने केले आहे.
मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, उपमुख्याधिकारी ममता राठोड आणि कर अधिकारी कल्याणी लाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कर वसुली मोहीम वेगाने सुरू आहे. यंदा ३८ कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्यापैकी १२ कोटी ४५ लाख रुपयांची वसुली झाली आहे. उर्वरित थकबाकी वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
कर अधिकारी लाडे यांनी सांगितले की, ‘‘१९ मे २०२५ अखेर थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांना ३१ मार्च २०२६ पर्यंत कर भरल्यास २ टक्के दंडात्मक व्याजाची संपूर्ण माफी मिळणार आहे. अधिक माहितीसाठी संबंधित भागातील लिपिक अथवा कर विभागाशी संपर्क साधावा.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

