तळेगाव दाभाडेसाठी ५२८ घरकुलांना मंजुरी
तळेगाव दाभाडे, ता. २५ : पंतप्रधान आवास योजना-शहरी ‘२.०’ योजनेअंतर्गत तळेगाव दाभाडे शहरासाठी ५२८ घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे शहरातील सर्वसामान्य व गरजू नागरिकांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार होणार आहे.
याबाबत नवी दिल्ली येथे गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली २३ फेब्रुवारी रोजी बैठक पार पडली. यात केंद्रीय मंजुरी व देखरेख समितीने (सीएसएमसी) देशभरातील २ लाख ८८ हजार अतिरिक्त घरांना मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये तळेगाव दाभाडे शहराचाही समावेश आहे. या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
शासन निकषांनुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांचा सर्वेक्षण करून २६ डिसेंबर २०२५ रोजी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. शहरातील सुमारे दोन हजार ५०० नागरिकांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी ५६८ लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळणार आहे. या प्रत्येक लाभार्थ्यास सुमारे ४२० चौरस फुटांचे घर उपलब्ध होणार असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
या योजनेमुळे केवळ घरकुलांची उभारणी होण्यासह शहराच्या पायाभूत सुविधांनाही चालना मिळणार आहे. तसेच तळेगावच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे. या योजनेच्या मंजुरीसाठी आमदार सुनील शेळके यांनी पाठपुरावा केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

