सर्वांनी मराठीची एकात्मता जपावी
तळेगाव दाभाडे, ता.५ ः ‘‘मराठी जनता जोपर्यंत मराठी भाषा आपल्या उराशी कवटाळत नाही, तोपर्यंत तिचा खऱ्या अर्थाने उद्धार होणार नाही. आपल्या सगळ्यांचा एकमेव पक्ष म्हणजे ‘मराठी’ असायला हवा आणि आपण सर्वांनी मराठीची एकात्मता जपली पाहिजे,’’ असे आवाहन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
साहित्य कला आणि संस्कृती मंडळ (ट्रस्ट) आणि तळेगाव दाभाडे नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा गौरव दिन आणि मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यातील विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ लेखक किरण जाधव यांच्या ‘संवर्धक’ या कथासंग्रहाचे प्रकाशनही करण्यात आले. तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, उपमुख्याधिकारी ममता राठोड, माजी नगराध्यक्ष संतोष भेगडे आणि नगर परिषदेचे पक्षप्रतोद सत्यम खांडगे यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभली.
मंडळाचे विश्वस्त सचिव अर्जुन गायकवाड यांनी प्रास्ताविक केले, तर कार्याध्यक्षा स्नेहलता बाळासाहेब यांनी आभार मानले. मुख्याध्यापिका वसुंधरा माळवदकर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मधुरा जोशी, अर्चना काळे, अनिता वैद्य, मयुरेश मुळे आणि मंडळाच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

