तळेगावात तीन वाणिज्यिक मिळकतींवर कारवाई
तळेगाव दाभाडे, ता. ६ : नगर परिषद हद्दीतील थकबाकीदार मिळकतधारकांविरोधात कर संकलन विभागाने कारवाईला सुरुवात केली आहे. गुरुवारी (दि. ५ मार्च) तीन वाणिज्यिक मिळकती सील करण्यात आल्या.
कर संकलन विभागामार्फत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातील मालमत्ता कर, पाणीपट्टी कर तसेच गाळा भाडे वसुलीची मोहीम सुरू करण्यात आली आहे. हद्दीतील सर्व थकबाकीदार मिळकतधारकांनी आपला मालमत्ता कर, पाणीपट्टी कर व गाळा भाडे विहित वेळेत भरून सहकार्य करावे. अन्यथा थकबाकीदारांवर अशाच प्रकारची कारवाई करण्यात येईल, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

