

तळेगाव दाभाडे, ता. ६ ः कामशेतमधील मावळ तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या सभापतीपदी किरण हुलावळे, तर उपसभापतिपदी सुनीता केदारी यांची निवड झाली.
गुरुवारी साहाय्यक निबंधक सर्जेराव कांदळकर यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. माजी सभापती शिवाजी असवले आणि उपसभापती अमोल भोईरकर यांनी आपापल्या पदांचा राजीनामा दिल्यामुळे ही पदे रिक्त झाली होती. सभापतिपदासाठी किरण हुलावळे व ज्ञानेश्वर निंबळे, तर उपसभापतिपदासाठी सुनीता केदारी व रमेश भुरूक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून प्रयत्न झाले; मात्र त्यास यश आले नाही. त्यामुळे मतदान घेण्यात आले.
हुलावळे यांना १०, तर निंबळे यांना ९ नऊ मते मिळाली. हुलावळे केवळ एका मताच्या फरकाने विजयी ठरले. केदारी यांना ११, तर भुरूक यांना सात मते मिळाली. एक मत बाद ठरल्याने केदारी चार मतांच्या फरकांनी विजयी झाल्या. या निवडणूक प्रक्रियेला संघाचे सर्व १९ सदस्य उपस्थित होते.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.