नायगाव येथील अपघातात दोन तरुणांचा मृत्यू

नायगाव येथील अपघातात दोन तरुणांचा मृत्यू

Published on

तळेगाव दाभाडे, ता. ६ : चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव मोटारीची धडक बसून दुचाकीवरील दोन तरुणांचा मृत्यू झाला. तर, कारमधील दोन युवक जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास कामशेत हद्दीत नायगाव येथील हिरकणी रिसॉर्टसमोर घडला. हे युवक शिवज्योत आणण्यासाठी किल्ले विसापूरकडे निघाले होते.
ओंकार आरडे (वय २२) व दर्शन शिंदे (वय २१, दोघे रा. वडेश्वर, ता. मावळ) यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. तर, कारमधील अजय देवकर (वय ३५) व अमर पडवळ (वय ३२, दोघे रा. वेहेरगाव, ता. मावळ) हे जखमी असून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘ओंकार व दर्शन हे मध्यरात्रीनंतर विसापूर किल्ल्यावरून शिवज्योत आणण्यासाठी दुचाकीवरून लोणावळ्याकडे निघाले होते. सुमारे दीडच्या सुमारास लोणावळ्याकडून येणारी एमएच-१४ जेए-५१११ क्रमांकाची स्विफ्ट मोटार चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुभाजक तोडून विरुद्ध दिशेच्या महामार्गावर गेली आणि तिने पुण्याकडून लोणावळ्याकडे जाणाऱ्या एमएच-१४ एमव्ही-२२९४ क्रमांकाच्या एर्टिगा मोटारीला धडक दिली. यानंतर मागून येणाऱ्या एमएच-१४ जीव्ही-५१७३ या दुचाकीला या मोटारीने धडक दिली. यात ओंकार आणि दर्शन यांचा जागीच मृत्यू झाला.’’
घटनेची माहिती मिळताच कामशेतचे पोलिस निरीक्षक शंकर पाटील तसेच वरिष्ठ अधिकारी येथे दाखल झाले. अपघातातील कारचालकांचे रक्तनमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com