उघड्यावर कचरा टाकल्यास
तळेगावमध्ये कारवाई होणार

उघड्यावर कचरा टाकल्यास तळेगावमध्ये कारवाई होणार

Published on

तळेगाव दाभाडे, ता. ६ : तळेगाव दाभाडे शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याच्या उद्देशाने नगर परिषद प्रशासनाने उघड्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. शुक्रवारी नगराध्यक्ष संतोष दाभाडे व मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विभाग प्रमुख अभिषेक शिंदे यांच्या सूचनेनुसार कारवाई सुरू करण्यात आली. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर कचरा टाकू नये, तसेच शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नगर परिषदेला सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. यासोबतच स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये जनजागृतीही करण्यात येत आहे.
या मोहिमेत स्वच्छता निरीक्षक प्रशांत शिवणे, सुनील काळकुटे, दत्तात्रय ढवळे, शहर समन्वयक शुभम चौकटे तसेच स्वच्छता पर्यवेक्षक राहुल आगळे यांनी सहभाग घेतला.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com