कर्जदारांना वेठीस धरल्यास कारवाई

कर्जदारांना वेठीस धरल्यास कारवाई
Published on

तळेगाव दाभाडे, ता. १० : मावळ तालुक्यात वाढत्या अवैध सावकारीच्या पार्श्वभूमीवर उपनिबंधक कार्यालयाने गेल्या वर्षी कारवाई करत १४ सावकारांचे परवाने रद्द केले होते. कोरे धनादेश किंवा कोरे स्टॅम्प पेपर घेऊन कर्जदारांना वेठीस धरणाऱ्या सावकारांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
तालुक्यातील काही भागांत खासगी सावकारीचे जाळे वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. जास्त व्याजदराच्या आमिषामुळे अनेकांनी सावकारीचा व्यवसाय सुरू केला आहे. काही ठिकाणी महिन्याला १० ते १५ टक्क्यांपर्यंत व्याज आकारले जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे कर्जदारांवर मोठा आर्थिक ताण निर्माण होत आहे.
तालुक्यात पूर्वी सुमारे ५० सावकार परवानाधारक होते. त्यापैकी नियमांचे उल्लंघन केल्याने १४ जणांचे परवाने जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने रद्द केले. सध्या ३६ सावकारांकडे वैध परवाने आहेत. नियमानुसार तारणासह कर्जावर वार्षिक १५ टक्के, तर बिनतारण कर्जावर १८ टक्के व्याज आकारण्याची मर्यादा आहे. काही खासगी सावकार मात्र महिना २० ते ३० टक्के दराने व्याज आकारून नागरिकांची पिळवणूक करत असल्याचे समोर आले आहे.

जमीन व्यवहारामुळे वाढले प्रमाण
गेल्या काही वर्षांत मावळ तालुक्यात जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार वाढल्याने मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल झाली आहे. या व्यवहारांमधून मिळालेल्या पैशातून काही जणांनी सावकारीचा व्यवसाय सुरू केल्याचे दिसून येते.

कर्जासाठी सावकारांकडे धाव
तळेगाव, वडगाव, कामशेत, लोणावळा, शहरांसह ग्रामीण भागांत खासगी सावकारांकडून कर्ज घेण्याचे प्रमाण वाढले आहे. काही वेळा बँका किंवा पतसंस्थांकडून कर्ज मिळण्यात अडचणी येत असल्याने नागरिक सावकारांकडे वळतात. मात्र जादा व्याजामुळे अनेक कर्जदार आर्थिक अडचणीत सापडत असल्याचे दिसते.
---
काही सावकार कोरे धनादेश किंवा कोरे स्टॅम्प पेपर घेऊन कर्जदारांना धमकावत असल्याच्या तक्रारी येत आहेत. अशा प्रकारचा त्रास होत असल्यास नागरिकांनी पुढे येऊन उपनिबंधक कार्यालयाशी संपर्क साधावा. तक्रार प्राप्त झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
- सर्जेराव कांदळकर, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, वडगाव मावळ
-----
फोटो
02388

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com