हॅंडब्रेक न लावल्याने टेम्पोची धडक; मुलीचा मृत्यू
तळेगाव दाभाडे, ता.१७ : हॅंडब्रेक न लावल्याने टेम्पो उतारावरून पुढे गेला. त्याची धडक बसून अकरा वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी (ता.१६) दुपारच्या सुमारास चौराईनगर, सोमाटणे फाटा येथे घडला.
ज्ञानेश्वरी दिनेश मुऱ्हे (रा. चौराईनगर, सोमाटणे फाटा) असे या अपघातात मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. तर, पोलिसांनी टेम्पोचालक बबनराम विश्वकर्मा (वय ३५, रा. गोडुंब्रे, ता. मावळ) आणि ओमप्रकाश विश्वकर्मा (वय ४८) यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘गॅस सिलिंडरची डिलिव्हरी करणारा टेम्पो (क्रमांक एमएच १४- केए-४८७६) उतारावर उभा करण्यात आला होता. त्यावेळी चालकाने हँडब्रेक लावला नाही. त्यामुळे टेम्पो पुढे सरकला आणि त्याची धडक ज्ञानेश्वरी हिला बसली. त्यात ती गंभीर जखमी झाली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

