गोल्डन रोटरी पिंकीथॉनला महिलांचा प्रतिसाद

गोल्डन रोटरी पिंकीथॉनला महिलांचा प्रतिसाद
Published on

तळेगाव दाभाडे, ता. ३० : रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे तर्फे आयोजित ‘गोल्डन रोटरी पिंकीथॉन २०२६’ ला तळेगावातील महिलांचा प्रतिसाद मिळाला.
यावेळी तळेगावचे नगराध्यक्ष संतोष दाभाडे, नगरसेविका संगीता खळदे, आशा भेगडे, शैलजा काळोखे उपस्थित होते.
सिने अभिनेत्री प्रियांका हांडे यांनी तळेगावातील महिला आरोग्याबाबत जागरूक असल्याचे पाहून समाधान व्यक्त केले. तर रोटरी डिस्ट्रिक्टच्या डीजी इलेक्ट चारू श्रोत्री यांनी गोल्डन रोटरीच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
संतोष परदेशी यांनी आभार मानले. सुरेश रजानी यांनी आगळीवेगळी वेशभूषा परिधान करून सर्वांचे लक्ष वेधले. कार्यक्रमात २० ‘लकी ड्रॉ’ चे आयोजनही करण्यात आले होते. मानाच्या पैठणीच्या मानकरी सुरेखा रूपनवर आणि श्रेया बाविस्कर ठरल्या. तर एक्वा फिल्टर च्या मानकरी अमृता पाटील, तसेच इतर भेटवस्तूंच्या मानकरी स्वागती नवनाथ घारे आणि सुषमा खोत ठरल्या.
सूत्रसंचालन प्रदीप टेकवडे यांनी केले, आभार प्रदर्शन प्रशांत ताये यांनी केले. नियोजन ललित देसले आणि क्लबच्या सर्व केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com