‘अस्तोदय’ चरित्रग्रंथाचे तळेगावात प्रकाशन

‘अस्तोदय’ चरित्रग्रंथाचे तळेगावात प्रकाशन
Published on

तळेगाव दाभाडे, ता. ११ : संजय साखळे लिखित ‘अस्तोदय’ हा चरित्रग्रंथाचा प्रकाशन सोहळा दादा-दादी पार्क येथील सभागृहात पार पडला. या प्रसंगी ‘अस्तोदय’ हा चरित्रग्रंथ युवा पिढीसाठी प्रेरणादायी असून तळेगावच्या विकासाचा सजीव दस्तऐवज ठरेल, असे प्रतिपादन डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील होते. यावेळी महेश महाजन, डॉ. अनंत परांजपे आदी उपस्थित होते.
साखळे यांनी तळेगाव दाभाडेच्या मातीतून घडलेल्या विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्तींच्या प्रेरणादायी कथा या ग्रंथातून मांडण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. प्रास्ताविक मीरा रामायणे यांनी केले.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com