आंद्रा धरणातून तळेगावला पाणी हक्क मंजूर

आंद्रा धरणातून तळेगावला पाणी हक्क मंजूर
Published on

तळेगाव दाभाडे, ता. १६ : वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पाणीटंचाईचा विचार करून जलसंपदा विभागाने तळेगाव दाभाडे शहरासाठी आंद्रा धरणातून ५.०९४ दशलक्ष घनमीटर (सुमारे ०.१७ टीएमसी) पिण्याच्या पाण्याचा हक्क मंजूर केला आहे. या निर्णयामुळे नागरिकांनी दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत हे पाणी पेयजल योजनेसाठी मंजूर करण्यात आले आहे. उपलब्ध पाण्याची गुणवत्ता पिण्यायोग्य ठेवण्याची जबाबदारी नगर परिषदेवर असेल. तसेच नदी खोरे प्राधिकरणाच्या नियमांनुसार दरवर्षी प्रत्यक्ष उपलब्ध साठ्यानुसार पाणीपुरवठा निश्चित केला जाणार आहे. हे पाणी मिळावे, यासाठी आमदार सुनील शेळके यांनी पाठपुरावा केला.
तळेगाव शहराचा वाढता विस्तार, नवीन वसाहती, औद्योगिक परिसर आणि २०५८ मधील लोकसंख्या लक्षात घेता हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. यामुळे

तळेगाव दाभाडे शहरासाठी शासनाने आंद्रा धरणातून पाणी मंजूर केल्याने शहरातील पाणीपुरवठा, उन्हाळ्यातील टंचाई आणि टँकरवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होणार आहे.
- संतोष दाभाडे, नगराध्यक्ष, तळेगाव दाभाडे

शहरातील वाढती लोकसंख्या आणि भविष्याचा पाणी टंचाईचा विचार करून शासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहराचा स्वच्छ व मुबलक पाणी मिळण्यास मदत होईल
- गिरीश दापकेकर, मुख्याधिकारी, नगर परिषद, तळेगाव दाभाडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com