कुंडमळा परिसरात तरुणाचा बुडून मृत्यू

कुंडमळा परिसरात
तरुणाचा बुडून मृत्यू
Published on

तळेगाव दाभाडे, ता. १७ : कुंडमळा परिसरात एका तरुणाचा शुक्रवारी (ता. १७) पाण्यात बुडून मृत्यू झाला. प्रथमेश लोणारी (वय २४, रा. फुगेवाडी) असे मृताचे नाव आहे. सलग तिसऱ्या मावळ तालुक्यात अशी दुर्घटना घडली.
प्रथमेशने चार-पाच मित्रांसह पार्टी केली. त्यानंतर तो पोहण्यासाठी पाण्यात उतरला. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाला. याबाबत सागर भेगडे यांनी तातडीने बचाव यंत्रणेशी संपर्क साधला. त्यानंतर वन्यजीव रक्षक मावळ संस्था व शिवदुर्ग मित्र, लोणावळा यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरू केले. अवघ्या ५ ते १० मिनिटांत त्यांनी लोणारीला शोधले. त्याला तातडीने तळेगाव दाभाडे येथील जनरल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. बचावकार्यात निलेश गराडे, भास्कर माळी, रवी कोळी, विराज गराडे, विनय सावंत, शाहरुख सय्यद, राजू सय्यद, सागर भेगडे, कुंदन भोसले यांच्यासह एमआयडीसी पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांनीही मदत केली.
याआधी बुधवारी (ता. १५) किवळे-सांगवडे परिसरात लोकेश रंगाप्पा चलवादी (वय ४७, रा. देहूरोड) यांचा पवना नदीत बुडून मृत्यू झाला होता. गुरुवारी (ता. १६) साळुंब्रे पुलाजवळ पवना नदीत बुडून रामेश्वर ज्ञानोबा भांड (वय २२, रा. पिंपरी) याचा मृत्यू झाला होता. या सलग दुर्घटनांमुळे प्रशासनाने धोकादायक ठिकाणी सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे. नागरिकांनीही पाणवठ्यामध्ये उतरताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com