पवना धरणातून गाळ काढणे सुरू

पवना धरणातून गाळ काढणे सुरू
Published on

तळेगाव दाभाडे, ता. २६ : पवना धरणातून गाळ काढण्याच्या कामाला रविवारपासून आरंभ करण्यात आला. यावेळी विधिवत पूजन करून मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते या उपक्रमाची सुरुवात झाली. गेल्या दहा वर्षांपासून कोणतीही शासकीय आर्थिक मदत न घेता, केवळ लोकसहभागाच्या जोरावर हे काम सुरू आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा वाढण्यास मदत होत असून, परिसरातील जलसंधारणाला बळ मिळत आहे. यंदाही पवना धरणातील जास्तीत जास्त गाळ काढून पाणीसाठ्यात वाढ करण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे. या प्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com