

तळेगाव दाभाडे, ता. २६ ः महावितरणच्या वडगाव मावळ उपविभागातील वीज ग्राहकांच्या प्रलंबित तक्रारींचा जलद निपटारा करण्यासाठी सोमवारी (ता. २७) एकदिवसीय ग्राहक तक्रार निवारण मेळावा आयोजित करण्यात आला आहे. द्वारकाधीश लॉन्स येथे सकाळी १०:३० ते सायंकाळी ४:३० या वेळेत ग्राहकांना सेवा उपलब्ध होईल. वडगाव उपविभागातील घरगुती, व्यावसायिक तसेच कृषी ग्राहकांना वीज देयकातील त्रुटी, नवीन जोडणी, मीटरबाबतच्या अडचणी किंवा तांत्रिक बिघाड यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. या सर्व तक्रारींचे एकाच ठिकाणी तत्काळ निवारण व्हावे आणि प्रलंबित अर्ज निकाली काढावेत, या उद्देशाने महावितरणकडून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ग्राहकांना वीज देयकातील दुरुस्ती, नवीन वीज जोडणीसाठी अर्ज, नाव बदलणे किंवा भार बदलण्याचे अर्ज, बंद किंवा नादुरुस्त मीटर बदलण्याबाबत तक्रारी
इतर तांत्रिक व प्रशासकीय समस्या थेट अधिकाऱ्यांसमोर मांडता येतील. या मेळाव्यास महावितरणचे कार्यकारी अभियंता केशव व्ही. काळूमाळी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून उप कार्यकारी अभियंता राहुल अमरसिंग परदेशी अध्यक्षस्थानी असतील.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.