‘स्वरस्मृती’ कार्यक्रमातून शरदराव जोशी यांना अभिवादन

‘स्वरस्मृती’ कार्यक्रमातून शरदराव जोशी यांना अभिवादन
Published on

तळेगाव दाभाडे, ता. १५ : श्रीरंग कलानिकेतनाचे संस्थापक ज्येष्ठ संगीतकार पं. शरदराव जोशी यांच्या सातव्या स्मृतीदिनानिमित्त ‘स्वरस्मृती’ या कार्यक्रम झाला. कार्यक्रमाची संकल्पना व संयोजन गायिका संपदा थिटे यांनी केले.
सुरुवात शरदराव जोशी यांच्या प्रतिमापूजनाने झाली. प्रास्ताविकात डॉ. मीनल कुलकर्णी यांनी केले. या प्रसंगी शंकरा, नटभैरव, बागेश्री, चारुकेशी, यमन, भैरव आदी रागांतील बंदिशी, तराणे तसेच बालगीते सादर झाली. कबीर शिरपूरकर यांनी व्हायोलिन वादन केले. तर कथ्थक नृत्यांगना मानसी दांडेकर व त्यांच्या शिष्यांनी नृत्यप्रस्तुती केली.
सांगता अस्मिता फाटक, इरा ठोके, लीना परगी आणि सावनी खाडिलकर यांच्या गायनाने झाली. ध्वनिसंयोजन केदार अभ्यंकर यांचे होते.
अध्यक्ष राजीव कुमठेकर यांनी संस्थेचे उपक्रम पुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

तळेगाव दाभाडे ः ज्येष्ठ संगीतकार पं. शरदराव जोशी यांच्या स्मृतीदिनानिमित्त कार्यक्रमात कला सादर केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com